शिशुविहार प्राथमिक शाळेबद्दल

शिशुविहार प्राथमिक शाळा,कर्वेनगर, पुणे    01-Jun-2023
Total Views |


शाळेची इमारत

स्थापना :-१४ जून १९५८ (डेक्कन कॉर्नर येथे.)
                     २०१२ साली डेक्कन कॉर्नर या परिसरातून शाळा कर्वेनगर परिसरात स्थलांतरित झाली.

 

विद्यार्थी केंद्रबिंदू मानून त्याचा सामाजिक, भावनिक शारीरिक व बौद्धिक विकास करणे, विविध कला कौशल्यांचा तसेच जीवनावश्यक कौशल्ये  विकसित व्हावीत यासाठी आमची शाळा प्रयत्नशील आहे.यासाठी विविध उपक्रमाचे आयोजन   केले जाते. मुलांच्या गुणवत्तेवर विशेष भर दिला जातो. संख्यात्मक विकासापेक्षा गुणात्मक विकासाकडे वैयक्तिक लक्ष देवून  विद्यार्थिनींचा सर्वांगीण विकास केला जातो.

शाळेत गणिती कौशल्ये विकसित व्हावी , पायाभूत गणिताचा विकास व्हावा. गणिताची आवड निर्माण व्हावी म्हणून “गणित प्रयोगशाळा” आहे.

      मुलींची अंतराळ विषयक जिज्ञासा वाढावी, त्यांचे अवकाशा विषयीचे कुतूहल वाढावे यासाठी शाळेत “खगोल लॅब” आहे काळाची गरज ओळखून तंत्रस्नेही विद्यार्थी निर्माण करण्यासाठी सुसज्ज अशी “संगणक लॅब” आहे. विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी “समृद्ध ग्रंथालय” शाळेमध्ये आहे. विद्यार्थीनीना विविध विषयाची पुस्तके वाचनासाठी दिली जातात.

त्याचबरोबर  इ. ४थी, ५ वी , ६ वी स्पर्धादल वर्ग , इ. ३ री ते ७ वी ,जर्मन भाषा वर्ग  तसेच ५ वी ते ७ वी संस्कृत परीक्षा वर्ग देखील शाळेत घेतले जातात. 

खेळाचे मैदान प्रशस्त आहे. विविध स्पर्धा परीक्षा ,बाह्य क्रीडा स्पर्धा, विद्यार्थिनीच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

सुसज्ज भव्य इमारत व सर्व भौतिक सुविधा शाळेमध्ये उपलब्ध आहेत.

प्रशिक्षित व अनुभवी शिक्षक वर्ग आहे. २००८ साली शाळेचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात आलेला आहे.