राष्ट्रीय विज्ञान दिन 28 फेब्रुवारी
शिशुविहार प्राथमिक शाळा,कर्वेनगर, पुणे 02-Mar-2024
Total Views |
राष्ट्रीय विज्ञान दिन 28 फेब्रुवारी
शिशुविहार प्राथमिक शाळा ,कर्वेनगर येथे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त बालसभा घेण्यात आली. या कार्यक्रमास माननीय मुख्याध्यापिका प्राजक्ता ताई वैद्य उपस्थित होत्या .कार्यक्रमाची सुरुवात "डोळे उघडून बघा गड्यांनो" या विज्ञान गीताने झाली .शाळेतील शिक्षिका शुभांगी ताई कुलकर्णी यांनी विद्यार्थिनींना विज्ञान दिनाची माहिती सांगितली .तसेच ज्येष्ठ शिक्षिका पल्लवीताई यांनी आपण ज्या दैनंदिन जीवनात अगदी लहानपणापासून कावळ्याची, चिमणीची तसेच बुडबुड घागरी यांसारख्या गोष्टी तून विज्ञान समजावून सांगितले .माननीय मुख्याध्यापिका प्राजक्ताताई यांनी इयत्ता 6 तील मराठी विषयातील विचारांचे परिवर्तन या पाठाद्वारे अंधश्रद्धा व विज्ञान या विषयी मार्गदर्शन केले. इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थिनींनी तयार केलेल्या प्रयोगाचे व मॉडेल यांचे प्रदर्शन भरवून इयत्ता 1 ली ते 7 वी च्या विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले .संपूर्ण महिनाभर निसर्गातील विविध वस्तूंचा वापर करून रचना तयार करणे तसेच छोटा सायंटिस्ट अंतर्गत विविध कौशल्य घेण्यात आली .तसेच भारतीय विविध वैज्ञानिकांची माहिती विद्यार्थिनींनी जमा केली. छोटे प्रयोग विद्यार्थिनींना दाखविण्यात आले.अशा परकारे संपूर्ण महिनाभर विविध कृतीद्वारे विज्ञान दिन घेण्यात आला.