विद्यार्थ्यांच्याबौद्धिक, मानसिक, शारीरिक, नैतिक, सामाजिक
कलागुणांना कौशल्याधिष्ठित करणारी आमची शिशुविहार प्राथमिक शाळा कर्वेनगर .
विद्यार्थ्यांच्या काळानुरूप असलेल्या गरजा ओळखून , तंत्रज्ञान
व आधुनिकतेच्या प्रगतीपथावर पाऊल ठेवत असताना भारतीय संस्कृतीचा वसा घेत आत्ताच्या
मराठी शाळांपेक्षाविविध उपक्रमांच्या
माध्यमातून मनोरंजनात्मक व कृतीयुक्त शिक्षणाचा ध्यास घेतलेली आमची शिशुविहार
प्राथमिक शाळा कर्वेनगर.
नाविन्यतेला , कल्पकतेला, सृजनतेला
अंगी जोपासून उज्ज्वल भविष्याकडे विद्यार्थ्यांना नेणारी 65 वर्षाहून अधिक अनुभव
असणारी सर्व सोईसुविधांनीयुक्त , गुणवत्तापूर्ण
शिक्षण देणारी , संस्कृती आणि संस्कार जोपासणारी, ज्ञानाचे
मंदिर असलेली शिशुविहार प्राथमिक शाळा कर्वेनगर(डे.जि).