'डॉक्टर जयंत नारळीकर' पुरस्कार

शिशुविहार प्राथमिक शाळा,कर्वेनगर, पुणे    04-Aug-2025
Total Views |
 

JayntNaralikarWwrd-1
 
   19 जुलै 2025 रोजी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या शिशुविहार प्राथमिक शाळा कर्वेनगर येथे डॉक्टर जयंत नारळीकर यांच्या जयंतीनिमित्त महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या इचलकरंजी हॉल मध्ये द ग्लोबल मिशन एस्ट्रॉनॉमी हेन्कल इंडिया आणि भारतीय युवक कल्याण व व्यायाम केंद्र तर्फे 'डॉक्टर जयंत नारळीकर' पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. IUCAA (Inter University Centre Of Astronomy and Astrophysics) डायरेक्टर प्रोफेसर आर. श्री आनंद जी यांना माननीय डॉक्टर भूषणजी पटवर्धन व माननीय गिरीशजी प्रभुणे यांच्या हस्ते १ला जयंत नारळीकर पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी NAAC चे चेअरमन तसेच UGC चे व्हाईस चेअरमन असलेले माननीय डॉ. भूषणजी पटवर्धन, चिंचवड येथील समरसता गुरुकुलम चे संस्थापक पद्मश्री माननीय गिरीशजी प्रभुणे, IAS डायरेक्ट असलेले माननीय राहुल रेखावार ,सकाळ माध्यम समूहाचे संपादक माननीय सम्राट फडणीस ,सीएसआर हेड असलेले हेन्कल इंडियाचे माननीय रमितजी महाजन ,हेंकल इंडियाचे मॅनेजर माननीय रुपेशजी सिंग, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या उपसचिव श्रीमती कांचन सातपुते मॅडम, IISER पुणे चे माननीय डॉ. लीलावती नारळीकर, माननीय मीनाताई जगधने तसेच शिशुविहार प्राथमिक शाळेच्या मा.मुख्याध्यापिका सौ.मीनाक्षी खिरीड उपस्थित होत्या.

JayntNaralikarWwrd-2