राष्ट्रीय विज्ञान दिन: दरवर्षी शाळेत २८ फेब्रुवारी हा दिवस "राष्ट्रीय विज्ञान दिन" म्हणून साजरा केला जातो. विज्ञानाचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोचवणे,विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवणे,वैज्ञानिक संशोधनासाठी प्रोत्साहन देणे ही उद्दिष्टे समोर ठेवून शाळेमध्ये विज्ञान प्रदर्शन, प्रात्यक्षिके, पोस्टर स्पर्धा, संशोधकांचा परिचय यांसारख्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.