जागर देवीचा

शिशुविहार प्राथमिक शाळा,कर्वेनगर, पुणे    02-Nov-2026
Total Views |
“शिशुविहार प्राथमिक शाळा कर्वेनगर कृत - जागर देवीचा भाऊबीज निधी संकलन उपक्रम”
 
या उपक्रमांतर्गत विद्यार्थिनींनी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे “स्त्रियांच्या प्रगतीसाठी चाललेले कार्य” समाजातील लोकांपर्यंत पोहोचवले आणि समाजातील दातृत्व शक्तीला भाऊबीज निधी संकलनासाठी आवाहन केले.
संस्थेचा हा भाऊबीज निधी संकलनाचा वसा पुढे चालवण्यासाठी आमच्या शाळेतील इयत्ता तिसरी ते सातवीच्या चिमुकल्या मुलींनी देखील खारीचा वाटा उचलला.
 
नवरात्रीनिमित्त देवीचा जागर करताना विद्यार्थिनींनी देवीची भक्तीगीते, जोगवा, गोंधळ ,भारुड, आरती, स्तोत्र इत्यादी सादरीकरण करून उपस्थित भाविक भक्तांची मने जिंकली. या निमित्ताने विद्यार्थिनींच्या कलागुणांना वाव मिळाला. विद्यार्थिनींमध्ये मनोमय कोश व आनंदमय कोश यांचे विकसन झाले. तसेच भारतीय संस्कृती, भक्तीभाव आणि परंपरेचे जतन करण्याचा सुंदर संदेश या निमित्ताने समाजापर्यंत पोहोचवता आला.
 
 
जागर देवीचा सादरीकरणाची काही क्षणचित्रे