स्थापना :-१४ जून १९५८ २०१२ साली डेक्कन कॉर्नर या परिसरातून शाळा कर्वेनगर परिसरात स्थलांतरित झाली. विद्यार्थी केंद्रबिंदू मानून त्याचा सामाजिक, भावनिक शारीरिक व बौद्धिक विकास करणे विविध कला कौशल्यांचा तसेच जीवनावश्यक कौशल्ये विकसित व्हावीत यासाठी आमची शाळा प्रयत्नशील आहे.यासाठी विविध उपक्रमाचे आय्जन केले जाते. मुलांच्या गुणवत्तेवर विशेष भर दिला जातो. संख्यात्मक विकासापेक्षा गुणात्मक विकासाकडे वैयक्तिक लक्ष दिले जाते.
आनन्दाध्ययनम् अर्थपुर्णानुभुती ददाति ते चक्षु:|
जून महिना सुरू झाला की वेध लागतात ते रिमझिम पडणाऱ्या पावसाचे आणि शाळेकडे धावणाऱ्या चिमुकल्या पावलांचे.... विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी काढलेल्या विविध रंग भरलेल्या रांगोळ्या तसेच शाळेच्या भिंतीवरील आकर्षक फळे या सर्व गोष्टींचे निरीक्षण करत, हातात रंगबिरंगी फुगे घेऊन मोठ्या आनंदात विद्यार्थिनींनी शाळेत प्रवेश केला.
आपला भारत देश लोकशाही प्रधान देश आहे. आणि लोक शाही मध्ये देशातील प्रत्येक नागरिकांच्या मताला महत्व असते. देशाचा भावी नागरिक म्हणून विद्यार्थिनीना मतदानाचा हक्क, कर्तव्य व त्याप्रती असणारी आपली जबाबदारी याची ओळख व्हावी या हेतूने शाळेत दरवर्षी मतदानाद्वारे शालेय मंत्रिमंडळ निवडणूक घेवून शपथविधी घेण्यात येतो.याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण विकसित करणे, लोकशाही मूल्यांची ओळख करून देणे, स्वयंशिस्त व संघटनशक्ती वाढवणे, , विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवणे, विद्यालयीन कामकाजात सक्रिय सहभाग, सामाजिक भान
दरवर्षी शाळेत २८ फेब्रुवारी हा दिवस "राष्ट्रीय विज्ञान दिन" म्हणून साजरा केला जातो. विज्ञानाचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोचवणे,विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवणे,वैज्ञानिक संशोधनासाठी प्रोत्साहन देणे ही उद्दिष्टे समोर ठेवून शाळेमध्ये विज्ञान प्रदर्शन, प्रात्यक्षिके, पोस्टर स्पर्धा, संशोधकांचा परिचय यांसारख्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
नवीन वाटचाली साठी व आगामी शिक्षण प्रवासासाठी शुभेच्छा व आशीर्वाद देणे या हेतूने शाळेमध्ये इ.७ वी मधील विद्यार्थिनींसाठी आशीर्वाद समारंभाचे आयोजन करण्यात येते. हा विद्यार्थिनींच्या आयुष्यातील एक महत्वाचा आणि भावनिक क्षण असतो. या समारंभात प्रार्थना, आशीर्वचन, शिक्षकांचे मार्गदर्शनपर भाषण, विद्यार्थिनींचे अनुभव कथन, सामूहिक फोटो व स्नेहभोजन यांचा समावेश असतो.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे कला. मुलांमध्ये अभ्यासाबरोबरच काही कलागुण असतात. ते प्रकट करण्याची संधी वेगवेगळ्या उपक्रमातून त्यांना मिळवून देणे हा या छंदवर्गामागील हेतू आहे. त्या त्या विषयातील तज्ञ मार्गदर्शनाकडून प्रशिक्षण हे या छंद वर्गाचे वैशिष्ट्य होते. यामुळे मुलींनी विविध कला व कौशल्य आत्मसात करून आनंद प्राप्त केला.
शाळेमध्ये दरवर्षी विविध संकल्पनावर आधारित वार्षिक स्नेहसंमेलन साजरे होते. यामध्ये वर्गातील जास्तीत जास्त मुलींना सहभागी करून घेतले जाते. शालेय अभ्यासक्रम पूर्ण करणे व त्यातूनच रोज एक ते दीड तास त्या सर्व मुलांचा सराव करून घेणे हे कौशल्याचे काम वर्गातील शिक्षक कसोशीने करतात. विद्यार्थी व शिक्षक यांच्या कष्टाचे चीज म्हणजे वार्षिक स्नेहसंमेलन होय.
प्रवासी पक्षी दिनाच्या औचित्य साधून कवयित्री संजीवनी बोकील यांच्या “त्यांना उडू द्या” या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिका श्रीमती. अश्विनी धोंगडे यांच्या हस्ते करण्यात आले.
नवरात्रीतील पाचवा दिवस म्हणजेच ललिता पंचमी. या दिवशी “वंदे स्त्री शक्ती” स्वरूपा सांगता समारंभानिमित्त आपल्या शाळेत “मर्मबंधातील ठेव ही..........” या जुन्या व दुर्मिळ प्रार्थना व कविता यांच्या संगीतमय सुरेख कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. जुन्या दुर्मिळ आठवणींचा ठेवा असलेल्या कविता व प्रार्थना याचे सुरेल आवाजात सादरीकरण विद्यार्थिनींनी केले.
शालेय अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांच्या शारीरिक तसेच मानसिक सबलीकरणासाठी दरवर्षी शाळेमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव साजरा करण्यात येतो.. “खेल खिलाडी खेल” या उक्तीप्रमाणे विद्यार्थी वर्गाबरोबर मैदानावर पण घडत असतो. त्यातूनच विद्यार्थ्यामध्ये एकोपा ,संघटन, निर्णयक्षमता,व खिलाडूवृत्ती यांसारखे गुण वृद्धिंगत होतात.
Copyright © 2025. Maharshi Karve Stree Shikshan Samstha, (MKSSS), Pune. . All rights reserved
Powered by Sangraha